*कोकण Express*
*भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेचा लाभ घ्या*
*शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांचे आवाहन*
*ककणकवली ः प्रतिनिधी*
अनुसूचित जाती प्रवर्गातील इयत्ता १० वी मध्ये ९०% किंवा त्याहून जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेंतर्गत ११ वी आणि १२ वी च्या शिक्षणासाठी दरवर्षी १ लाख असे एकूण २ लाख पुरस्कार रक्कम दिली जात आहे . यासाठी संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे. या योजनेचा अनुसूचित जातीतील ९०% हुन अथवा त्याहून जास्त गुण दहावीत मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील अथवा वार्षिक उत्पन्न अडीच लाख असणे बंधनकारक आहे. एकूण ४ हप्त्यात २ लाख रुपये विद्यार्थ्याला दिले जाणार आहेत. या योजनेचा पहिला हफ्ता ५० हजार असणार आहे . पुढील ३ हप्त्यांसाठी ११ वी आणि १२ वी च्या सहामाही व वार्षिक परीक्षेत किमान ७५% गुण असणे आवश्यक आहे. हुन अथवा त्याहून जास्त गुण दहावीत मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी ही योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील अथवा वार्षिक उत्पन्न अडीच लाख असणे बंधनकारक आहे. फॉर्म संकेतस्थळावरून डाउनलोड करून माहिती भरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी २८, राणीचा पुणे बाग ४११००१ या पत्त्यावर पाठवावा, असे आवाहन सुजित जाधव यांनी केले आहे.