*कोकण Express*
*सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज याच वर्षापासून सुरू होण्यासाठी प्रयत्न व्हावेत….*
त्रुटी पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षियांना भेटणार…*
*कृती समितीचे अध्यक्ष श्याम सावंत*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मान्यता रद्द झाली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जाहीर करण्यात आलेले मेडिकल कॉलेज याच शैक्षणिक वर्षापासून सुरू होण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.त्यासाठी आमचा रेटा यापुढेही सुरू राहील,अशी भूमिका आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज कृती समितीचे अध्यक्ष श्याम सावंत यांनी जाहीर केली. दरम्यान समितीने काढलेल्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पुढाकार घ्यावा,त्यासाठी येत्या आठवड्यात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत,असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या मेडिकल कॉलेजची परवानगी दिल्यानंतर काही त्रुटी काढून रद्द करण्यात आली आहे.त्या पुर्ण करण्यासाठी तीन आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी लक्ष्मण नाईक उपस्थित होते.