*कोकण Express*
*तहसीलदार पवार यांनी मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणी बाबत शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन*
*राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या घरी केले मार्गदर्शन*
*फोंडाघाट ः प्रतिनिधी*
राज्य शासनाच्या ई पीक पाहणी या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये मोबाईल ऍपदवारे पिकांची प्रत्यक्ष नोंदणी व पिकांची माहिती छायाचित्रांसह शेतकऱ्यांनी अपलोड कशी करावीत या संदर्भातील माहिती देण्यासाठी तहसीलदार रमेश पवार यांनी फोंडाघाट नवी कुर्ली वसाहत येथे नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या निवासस्थानी गावातील शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या वेळी मंडळ अधिकारी प्रभू देसाई, लोरे तलाठी श्रीमती जंगले, फोंडाघाट तलाठी कांबळे आदी उपस्थित होते.