*कोकण Express*
*वैभववाडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनवणे यांची लोणावळा उपजिल्हा रुग्णालय येथे बदली*
*वैभववाडी व्यापारी मंडळाने डॉ.सोनवणे यांना दिल्या सदिच्छा*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.मनोहर सोनवणे कार्यरत होते.त्यांची लोणावळा उपजिल्हा रुग्णालय येथे बदली झाली. कोव्हिड काळात त्यांनी वैभववाडी तालुक्यातील आरोग्य सेवा उत्तम रितीने हाताळली होती. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वैभववाडी तालुका व्यापारी मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर कदम, डॉ.सयाजी धर्मे, माजी नगरसेवक संजय सावंत, शिक्षक नेते शरद नारकर, आदी वैद्यकीय अधिकारी पदाधिकारी व व्यापारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.