*कोकण Express*
*वैभववाडी येथे २२ सप्टेंबरला आबासाहेब रावराणे यांची शोकसभा*
लोरे नं २ गावचे सुपुत्र, माजी सभापती आबासाहेब रावराणे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांची शोकसभा बुधवार दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वैभववाडी येथील दत्त मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.
आबासाहेब यांनी गगनबावडा तालुक्याचे सभापती पद भूषविले होते. वैभववाडी तालुका निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. तळकोकणचा बुलंद आवाज म्हणून ते कोल्हापूरच्या राजकारणात परिचित होते. माजी मुख्यमंत्री शरद पवार, बाबासाहेब कुपेकर, रत्नाप्पा कुंभार, बाळासाहेब माने, यशवंत एकनाथ पाटील यांचे ते जवळचे सहकारी होते.
आबासाहेब यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या शोकसभेत वैभववाडी वासियांनी उपस्थित राहावे असे आवाहन वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी केले आहे.