अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या

*कोकण Express*

*अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या…*

*वैभववाडी पोलिसांची कामगिरी; मुलीलाही घेतले ताब्यात…*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेणाऱ्या ऋषिकेश आनंदा जानकर याच्या मुसक्या आवळण्यात वैभववाडी पोलीसांना यश आले आहे. पो. नि. अतुल जाधव यांच्या कुशल नेतृत्वाखाली वैभववाडी पोलिसांनी थेट अहमदनगर गाठत संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याच्याविरोधात वैभववाडी पो. ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्या अल्पवयीन युवतीला बालसुधारगृहात ठेवण्यात येणार आहे.
अकरावीत शिकणाऱ्या तालुक्यातील अल्पवयीन युवतीचे १५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अपहरण झाल्याची तक्रार वैभववाडी पोलीस ठाण्यात तिच्या नातेवाईकांनी दाखल केली होती. पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी या गुन्ह्यात स्वतः लक्ष घालत घडलेल्या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती मिळवली. इंस्टाग्रामवरून जुळलेल्या प्रेमसंबंधातून ही घटना घडल्याची माहिती त्यांना मिळाली. दरम्यान तपासाची चक्रे अधिकारी श्री. जाधव यांनी फिरवली. अल्पवयीन मुलीचे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील ऋषिकेश आनंदा जानकर याने अपहरण केल्याची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, पोलीस नाईक मारुती साखरे, कॉन्स्टेबल बिलपे यांचे पथक आरोपी जानकर याच्या मागावर पाठवले. पीएसआय देसाई यांच्या पथकाने वरवंडे ता.राहुरी जिल्हा अहमदनर येथे जात आरोपी ऋषिकेश जानकर याच्या मुसक्या १९ सप्टेंबर रोजी आवळल्या. तसेच अपहरण झालेल्या युवतीलाही ताब्यात घेत वैभववाडीत आणले. सदर युवती अल्पवयीन असल्यामुळे तिला बालसुधारगृहात पाठविण्यात येणार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी ऋषिकेश व अपहरण झालेल्या युवतीची इन्स्टाग्रामवर काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. ऋषिकेश त्या अल्पवयीन युवतीला भेटण्यासाठी अहमदनगर वरून स्कुटी ने प्रवास करून त्या गावात आला. आणि १५ सप्टेंबर रोजी अल्पवयीन युवतीचे स्कुटीवरूनच अपहरण केले. गुन्ह्याचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बंगडे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!