*कोकण Express*
*कळणे वासियांना केली पिण्याच्या पाण्याची सोय ; परशुराम उपरकर*
*खाण दुर्घटनाग्रस्त कळनेवासियांना उपलब्ध केली पाण्याची सोय*
*दोडामार्ग ः प्रथमेश गवस*
काही दिवसांपूर्वी कळणे खाण येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर त्याठिकाणचे पिण्याचे पाणी दूषित झाले होते. त्यावेळी प्रशासनाकडून तेथील पाणी शुद्ध होत नाही, तोपर्यंत पाणी पुरवठा करण्याचे सांगण्यात आले होते. परंतु, खाण कंपनीने सदर पाणी वितरकाचे बिल अदा न केल्याने तेथील पाणी पुरवठा अचानक बंद केला. त्यामुळे तेथील नागरिकांची गेले ९ – १० दिवस गैरसोय होत आहे. ही बाब मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्या भागात पाण्याची सोय केली आहे. याबद्दल कळणे वासियांनी मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचे आभार व्यक्त केले आहेत. याबाबतची माहिती मनसे पदाधिकारी अभय देसाई यांनी दिली आहे.