*कोकण Express*
*वैभववाडी भाजपाच्या वतीने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन*
*पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह पोलीस प्रशासनाचे केले अभिनंदन*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील कोरोना, अतिवृष्टी, महापुर यांसारख्या सततच्या संकटांच्या मालिकेबरोबरच वैभववाडी तालुक्यातील गावा गावांमधील शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वैभववाडी पोलीस प्रशासन नेहमीच अग्रेसर राहिले आहे. काल वैभववाडी तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेलेल्या आरोपीला पोलीस प्रशासनाने वरवंडे ता. राहुरी जिल्हा- अहमदनगर येथे जाऊन बेड्या ठोकल्या. या त्यांच्या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याबद्दल आज वैभववाडी तालुका भाजपाच्या वतीने वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव व त्यांचा संपूर्ण टिमचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी भाजपा वैभववाडी तालुकाध्यक्ष नासीरभाई काझी, महिला तालुकाध्यक्ष प्राची तावडे, माजी महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, माजी सभापती शुभांगी पवार, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.