*कोकण Express*
*मोती तलावात युवकाची आत्महत्या ? दुचाकी व चप्पल काठावर*
ओटवणे पुलावर चार चाकी गाडी लावून एका चौकुळ येथील युवकाने आत्महत्या केल्याचा संशय असतानाच सोमवारी दुपारी सावंतवाडी शहरातील मोती तलावात अन्य एका युवकाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तलावाच्या काठावर त्याची दुचाकी व चप्पल आढळून आल्याने त्याने तळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली असावी असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मोती तलावात असलेल्या स्पीड बोटच्या सहाय्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
दरम्यान काठावर आढळलेली दुचाकी व चप्पल यामुळे सदरचा युवक सावंतवाडी शहरातील प केसरकर नामक युवक असावा असा अंदाजही व्यक्त होत आहे. मात्र मृतदेहाचा शोध लागल्यानंतरच त्याची खात्री होणार आहे.