*कोकण Express*
*सिंधुदुर्ग राजाचे थाटात विसर्जन ; निलेश राणे कार्यकर्त्यांत रमले*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
कुडाळ येथील भाजप कार्यालयासमोर प्राणप्रतिष्ठापना झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे आज अनंत चतुर्दशी दिवशी थाटात विसर्जन झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे उपस्थित होते त्यांनी गणरायाची निरोपाची पूजा करून महाआरती केली. कार्यकर्त्यांशी दिलखुलास गप्पा मारताना त्यांनी बाळगोपाळांनाही वेळ दिला.
निलेश राणे खासदार असताना सिंधुदुर्गचा राजा गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून हा दिमाखदार सोहळा अव्याहत सुरु आहे. यावर्षीही भव्य स्वरुपात हा उत्सव झाला. नामांकित भजन मंडळांनी आपली संगीत सेवा राजाच्या दरबारी रुजू केली.
आज विसर्जनादिवशी निलेश राणे सकाळीच राजाच्या मंडपात दाखल झाले. आणि त्यांनी पूजाविधीत सहभाग घेतला. त्यानंतर कार्यकर्ते आणि गणेश भक्तांशी सुसंवाद साधला. बाळगोपाळांनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढली. संध्याकाळची पूजाही निलेश राणे यांच्या हस्तेच करण्यात आली.
सर्व जनतेला चांगले आरोग्य, ऐश्वर्य लाभो तसेच कोरोना महामारी पासून सुटका होऊ दे, असे साकडे निलेश राणे यांनी गणरायाला घातले.
भाजप कार्यालय ते पावशी तलावापर्यंत राजाचा निरोपाची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते रणजित देसाई, तालुकाध्यक्ष विनायक राणे, दादा साईल,महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, ओबीसी जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर,ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष दीपलक्ष्मी पडते,अस्मिता बांदेकर, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम,आनंद शिरवलकर, विशाल परब,बाबा परब साईनाथ दळवी,माजी नगरसेवक सुनील बांदेकर,शहर अध्यक्ष राकेश कांदे,रेखा काणेकर,नगरसेविका साक्षी सावंत,मोहिनी मडगावकर,सुधीर आडीवरेकर,ममता धुरी, अविनाश पराडकर, राकेश नेमळेकर,नागेश नेमळेकर,निलेश परब, रूपेश कानडे, पप्या तवटे,मंगेश चव्हाण,चंदन कांबळी,विश्वास पांगुळ,सतीश माडये,भूषण राणे, साईनाथ दळवी,स्वरूप वाळके,विठलं धडाम,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.