*कोकण Express*
*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फोंडाघाट प्रा. आ. केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांसह लसीकरण लाभार्थ्यांचा करण्यात आला सत्काार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाचा विचार केल्यास सर्वात मोठे व मोफत लसीकरण आपल्या भारत देशात करण्यात आले आणि याचे सर्वात मोठे श्रेय भारताचे क्रीयाशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. असे म्हणत कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण करून घेणारे लाभार्थी तसेच लसीकरणामध्ये अग्रक्रमाने मोलाचे योगदान काम करणारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार फोंडाघाट भाजपच्या वतीने करण्यात आला व त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. तसेच भविष्यातही अशाच प्रकारे जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पं. स. कणकवलीचे सभापती मनोज रावराणे, माजी सभापती सुजाता हळदिवे-राणे, बबन हळदिवे, सरपंच संतोष आग्रे, विश्वनाथ जाधव, विजय फोंडेकर, आत्माराम येरम, राजेश शिरोडकर, विलास लाड, संतोष रेडकर, नरेश गुरव, सुमन गुरव, डॉ. जंगम, सौ. टिकले, सौ. हिंदळेकर सिस्टर इ. तसेच विभागातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.