*कोकण Express*
*कणकवली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांना मातृशोक*
*कणकवली ः प्रतिनिधी*
फोंडाघाट बाजारपेठेतील प्रतिष्ठित व्यापारी तथा कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांच्या मातोश्री श्रीमती निर्मला राधाकृष्ण पावसकर (वय ७९) यांचे गुरुवारी दु.खद निधन झाले. हे वृत्त कळताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पावसकर कुटुंबियांच्या निवास्थानी भेट घेऊन अंत्यदर्शन घेतले व मृतात्म्यास चिरशांती लाभोत ही प्रार्थना केली. त्यांना तीन मुलगे, एक मुलगी असा मोठा परिवार आहे.