*कोकण Express*
*आजगावं येथील मोबाईल टॉवरसाठी सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश..*
*भाजप युवा मोर्चा उपतालुका प्रमुख सचिन प्रभू यांची माहिती*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
आजगावं येथील मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी केलेल्या प्रयत्नाने अखेर कामकाज सुरू करण्यात आले असल्याचे भाजप युवा मोर्चा उपतालुका प्रमुख सचिन प्रभू यांनी महिती दिली आहे.
आजगाव,धाकोरे,भोम या तिन्ही गावात नेटवर्क ची मोठी समस्या होती. यामुळें याठिकाणी बी एस एन एल कडून मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जागा निवडून त्याठिकाणी मनोरा उभारला.माञ हा मनोरा उभारून एक वर्ष उलटूनही कार्यान्वित करण्यात आलेला नव्हता. यामुळें मळेवाड सरपंच व सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी सदरचा टॉवर कार्यान्वित करण्यासाठी बी एस एन एल कंपनीला उपोषणाचा इशारा दिला होता. यावेळी बी एस एन एल कडून सदरचा टॉवर 31 सप्टेंबर 2021 पूर्वी कार्यान्वित करण्यात येईल असे लेखी पत्र मराठे यांना दिले. या मुदती पूर्वी टॉवर कार्यान्वित न झाल्यास उपोषण छेडण्यात येईल असेही मराठे यांनी अधिकाऱ्यांना सांगीतले होते.अखेर या टॉवर च्या यंत्र सामुग्री जोडण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.याबाबत मराठे यांनी वारंवार पाठपुरावा केला असून बी एस एन एल जिल्हा प्रबंधक देशमुख यांनी लेखी पत्रातील दिलेल्या मुदतीत टॉवर कार्यान्वित करण्यात येईल असेही मराठे यांनी सांगीतले आहे.यामुळे मराठे यांनी आजगाव येथे उभारलेला मनोरा कार्यान्वीत होण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश आल्याचे दिसून येत आहे.