नगरविकास खात्याकडून घरबांधणीच्या परवानगीसाठी आता “ऑफलाईन” अर्ज करता येणार

नगरविकास खात्याकडून घरबांधणीच्या परवानगीसाठी आता “ऑफलाईन” अर्ज करता येणार

 *कोकण Express*

*नगरविकास खात्याकडून घरबांधणीच्या परवानगीसाठी आता “ऑफलाईन” अर्ज करता येणार…*

*“युडीसीपीआर” प्रणालीचे कोडे तूर्तास सुटले*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

घर बांधणीच्या परवानगीसाठी आता ऑफलाईन अर्ज करता येणार आहे.तशा प्रकारची नगरविकास खात्याकडून परवानगी देण्यात आली आहे.याचा फायदा ग्राहकांसह नवीन घर बांधणाऱ्या ग्राहकांसह अभियंत्यांना होणार आहे. याबाबत सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी दुजोरा दिला आहे. ऑनलाइन प्रक्रिया करताना यु.डी.सी.पी.आर प्रणालीमध्ये त्रुटी येत असल्याने ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ही प्रक्रिया राबवत येणार आहे त्यामुळे गेले वर्षभर निर्माण झालेला घोळ संपुष्टात आला आहे. याबाबतचे आदेश अवर सचिव किशोर गोखले यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र सावंतवाडी मुख्याधिकाऱ्यांसह, भुसावळ, बीड, वर्धा, बारामती, अचलपूर या नगरपरिषदांना देण्यात आले आहेत.

बी.पी.एम.एस प्रणाली मध्ये ड्रेसिंग हाईट प्रॉब्लेम प्रोग्रॅम ओपन होणे फाईल खराब होणे अशा समस्यांना ग्राहकांसह अभियंत्यांना तोंड द्यावे लागत होते. ही प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने झाल्याने सोयीस्कर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!