*कोकण Express*
*शिवसेना आमदार वैभव नाईक यांची “मिठी मिठी” बाते उघड करणार!*
*आमदारकी कुडाळ-मालवणच्या विकासासाठी नाही, तर मुंबईत खोट्या कामातल्या भ्रष्ट्राचारासाठी वापरली – निलेश राणे यांचा आरोप*
“शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी मुंबईतील मिठी नदी प्रकल्पात खोटे प्रकल्पग्रस्त तयार करून त्यांना घर मिळावे म्हणून शिफारस केली. आधार कार्ड वेगळे आणि माणसं वेगळी, आमदारकी वापरून एजंट कडून पैसे कमवायचा हा धंदा केला. या विषयाच्या खोलपर्यंत जाऊन सर्व संबंधितांना शिक्षा होणार याची मी खात्री देतो”, असे सनसनाटी ट्विट नुकतेच भाजपाचे फायरब्रॅंड नेते प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केले आहे. या प्रकरणामुळे कोकणच्या राजकारणात खळबळ माजली असून कोकण विकासाचे बुरखे पांघरून स्वतः गब्बर होणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांच्या वस्त्रहरणाचा सिलसिला चालू झाला आहे.
*काय आहे हे प्रकरण?*
माजी खासदार भाजपा नेते निलेश राणे यांच्या आरोपानुसार शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा हा एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे. प्रकरण असे आहे की मिठी नदीला लागून असलेली सर्व बांधकामे यापूर्वी पाडण्यात आलेली आहेत. परंतु जेव्हा ही बांधकामे होती, त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांची नावे आणि त्या नावानुसार कागदपत्रे, ओळखपत्रे सादर करायची असतात. अशा दहा नावांच्या व्यक्तींना कांजूरमार्ग येथे घर मिळावे यासाठी वैभव नाईक यांनी शिफारस पत्रे दिली. परंतु यातली दहापैकी नऊ नावे अशी आहेत, ज्यांची ओळखपत्रे, पत्ते, मतदार यादीतील संदर्भ यांच्यामध्ये मोठा घोटाळा आहे. या व्यक्ती आस्तित्वात आहेत की नाही याची खात्री कुठल्याच शासकीय विभागांना होत नाहीय. दहापैकी फक्त एका व्यक्तीला घर मिळाले असून इतर व्यक्ती या बनावट असल्याची खात्री शासकीय विभागांना होत चालली आहे. खोट्या नावांच्या माणसांना घर मिळण्यासाठी वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीचा वापर करत शिफारस पत्र दिले आहे.
*आमदार वैभव नाईक यांच्यासह या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांना शिक्षा ही होणारच!*
निलेश राणे यांच्या प्रसारीत व्हिडीओ क्लिपमध्ये त्यांनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांना शिक्षा ही होणारच आहे. मुंबईमध्ये असे एजंट असतात की अशा पद्धतीने गैरमार्गाने पैसे कमावण्यासाठी आमदाराला धरून त्याचा वापर करून घेतात आणि व्यवहारातली भागीदारी देतात. दुर्दैव हे की वैभव नाईक यांनी आमदारकीचा वापर कुडाळ मालवण मतदारसंघासाठी केला नाही, तर मुंबईत अशा गैरधंद्यातून मलिदा लाटण्यासाठी केला. आम्हाला हा संशय होताच. आमदार वैभव नाईक आता या प्रकरणातून वाचू शकत नाहीत. वैभव नाईक यांचे यासंदर्भातले पत्रव्यवहार आम्हाला प्राप्त झाले असून आम्ही कोर्टामार्फत याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार करणारच आहोत, परंतु आमदारकीचा गैरवापर केला म्हणून निवडणूक आयोग, तथा लोकयुक्तांकडे तक्रार सुद्धा दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांना शिक्षा ही होणारच, एवढे मी खात्रीलायकपणे सांगतो, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.