*कोकण Express*
*मळेवाड गावातील पाच महिलांना उज्वला गॅसचे वितरण करण्यात आले*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या वतीने ज्या कुटुंबांकडे गॅस नाहीत अशा कुटुंबातील महिलांना चुलीवर जेवण करावे लागत असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण होत होता.याचा विचार करून कुटुंबातील महिलेला उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस उपलब्ध करून देण्यात येत आहेत.याच योजनेतून मळेवाड गावातील पाच महिलांना गॅस कनेक्शन देण्यात आली. गॅस कनेक्शन मिळाल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले. यावेळी वितरण प्रसंगी सरपंच हेमंत मराठे, ग्रामविस्तार अधिकारी अनंत गावकर, ज्योती शिरसाठ,दिलीप शिरसाठ, सिद्धेश मुरकर आदी उपस्थित होते.