*कोकण Express*
*तोंडवलीतील ग्रामस्थांनी मानले जि. प. अध्यक्षा सौ.संजना सावंत यांचे आभार*
*तोंडवलीती उद्या लसीकरण मोहीम*
प्राथमिक आरोग्य केंद्र कासार्डे आणि उपकेंद्र वाघेरी अंतर्गत येत असलेल्या तोंडवली बावशी गावात आतापर्यंत तीन वेळा कोरोना लसीकरण मोहीम पार पडली आहे. तोंडवली बावशी गावातील ग्रामस्थांना लस घेण्यासाठी लांब कासार्डे येथे जावं लागतं या साठी तोंडवली बावशी ग्रामपंचायतीने जि. प. अध्यक्षा सौ.संजना सावंत यांना निवेदन पत्र दिले होते जेणे करून लसीकरण मोहीम तोंडवली गावात राबवावी आणि नागरिकांचा त्रास कमी व्हावा,या निवेदनाचा मान ठेऊन जि. प. अध्यक्षा सौ.संजना सावंत यांनी आता पर्यंत तोंडवली बावशी गावात ३ वेळा लसीकरण मोहीम राबवली आहे या साठी तोंडवली बावशी गावातील सर नागरिकांनी तसेच तोंडवली बावशी ग्रामपंचायतीन जि. प. अध्यक्षा सौ.संजना सावंत यांचे शब्दशहा आभार मानले आहेत. जि. प. अध्यक्षा सौ.संजना सावंत म्याडम यांनी तोंडवली बावशी गावात अजून काही लसीकरण मोहीम राबवून गावात १००% लसीकरण करावं अशी इच्छा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
उद्या दिनांक ०४/०९/२०२१ सकाळी ठीक 10 वाजता तोंडवली मध्ये बोभाटेवाडी शाळेत लसीकरण मोहीम होणार आहे तरी गावातील लस घायचा राहिलेल्या नागरिकांनी उद्या लस घेण्याच आव्हान तोंडवली ग्रामपंचायतीन केलं आहे..