*कोकण Express*
*जिल्ह्यात ३८ हजार लस प्राप्त:-संजना सावंत*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी गणेश चतुर्थी काळात मुंबई व पुणे या शहरी भागातून चाकरमानी लोक गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत असतात. अशा पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होणे गरजेचे होते. ही बाब विचारात घेऊन दिनांक 31.08.2021 च्या पत्राने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवापूर्वी मोठ्याप्रमाणावर लस पुरवठा होणे बाबत डॉ. अर्चना पाटील अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा यांचे लक्ष वेधले होते. तसेच दूरध्वनीवरून त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून एकाच दिवशी जिल्ह्यात प्राप्त 32000 डोस एकाच दिवशी लोकांना देण्याचे नियोजन देखील जिल्हा परिषद आरोग्य विभागाने यापूर्वी केले आहे व गणेश चतुर्थीपूर्वी जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे. या गोष्टीकडे देखील त्यांचे लक्ष वेधले. त्यास अनुसरून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गणेशोत्सव काळापूर्वी 35 हजार covid shield आणि 3 हजार co- vaccination जिल्ह्यासाठी प्राप्त झाली असून यापुढे देखील अशाच पद्धतीने पुरवठा होणार असल्याचे संजना सावंत यांनी जाहीर केले.