*कोकण Express*
*भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या दौर्याने कणकवलीत शिवसेना -भाजपा वातावरण तापले*
*कणकवली ः प्रतिनिधी*
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या निमित्ताने कणकवली येथे सेना-भाजपामध्ये पुन्हा एकदा जोरदार वातावरण तापल्याचे दिसून आले.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने “किरीट सोमय्या तुम्ही बोलला त्याचा काय झालं? आज सांगाल का? सिंधुदुर्ग आपली वाट बघतोय” या मथल्या खालील एलईडी स्क्रीन लावून त्या स्क्रीनवर नारायण राणे यांच्या बद्दल किरीट सोमय्या यांनी केलेल्या त्यावेळच्या आरोपां बद्दल आठवण करून देणारी स्क्रिन लावत शिवसेनेने जोरदार वातावरण निर्मिती केली. यावेळी पोलिसांनी मानवी साखळी उभी करत वाद टाळला असला तरी दोन्ही बाजूने वातावरण धुमसत असल्याचे दिसत होते. भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांचे कणकवलीत नरडवे चौकात आगमन होताच भाजपने जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात नारायण राणे यांच्या विरोधात बोललेल्या व्हिडीओ क्लीप लावण्यात आली असून त्यामुळे सेना-भाजप मधला संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. या ठिकाणी वादाची ठिणगी पडू नये म्हणून पोलिसांनी मोठा फौजफाटा ठेवण्यात आला आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोरच भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते जमले असताना शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने “किरीट सोमय्या तुम्ही बोलला त्याचा काय झालं? आज सांगाल का? सिंधुदुर्ग आपली वाट बघतोय” या मथल्या खालील एलईडी स्क्रीन लावून त्या स्क्रीनवर नारायण राणे यांच्या बद्दल किरीट सोमय्या यांनी केलेल्या त्यावेळच्या आरोपां बद्दल आठवण करून देणारी स्क्रिन याठिकाणी लावल्याची माहिती यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिली. या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले असून, सोमय्या यांचे स्वागत करत असताना शिवसेनेने अशा प्रकारे केलेला हा स्टंटसाठी परवानगी घेतली आहे का? तसे असेल तर दहा मिनिटे वाट पाहू अन्यथा आम्ही या ठिकाणी एलईडी स्क्रीन किंवा डीजे लावू असा इशारा भाजपा कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळे कणकवली शिवसेना शाखेसमोर भाजपा व शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले त्या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दंगल नियंत्रण पथकसह पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था सज्ज केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेपासून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालेला सुप्त संघर्ष अद्यापपर्यंत संपला नसल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा जाणवले.