*कोकण Express*
*सिंधुदुर्ग*
मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना दुपारी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. आज रात्री राणेंना महाड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. राणेंना रायगड कोर्टासमोर हजर करण्यात आले. सरकारी वकील आणि राणेंच्या वकीलानी केलेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने राणेंना जामीन मंजुर केला आहे.तत्पूर्वी आज सकाळपासून घडलेल्या घटनांमध्ये रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन नाकारला होता.तर हायकोर्टानेही राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे नामदार राणेंच्या जामीन अर्जावर केव्हा सुनावणी होणार याची भाजपा कार्यकत्यांसह राणेप्रेमीनाही उत्सुकता होती. त्यामुळे नारायण राणेंना जामीन मंजूर होताच भाजपा कार्यकर्त्यानी सुटकेचा निःश्वास टाकत एकच जल्लोष केला. दरम्यान राणेंना जामीन मिळाल्यानंतर जनआशीर्वाद यात्रा राणेंच्या उपस्थितीत उद्या सकाळपासून नियोजित दौऱ्यानुसार होणार आहे.