कणकवली पोलीस ठाण्यासमोर भाजपाचे ठिय्या आंदोलन

कणकवली पोलीस ठाण्यासमोर भाजपाचे ठिय्या आंदोलन

*कोकण Express*

*कणकवली पोलीस ठाण्यासमोर भाजपाचे ठिय्या आंदोलन*

*केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना सोडेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राणे साहेबांवर विनाकारण कारवाई केली.त्यांना ठाकरे सरकारने सत्तेचा गैरवापर करून अटक केली आहे.केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना आधी सोडा.जर त्यांच्यावर अशी कारवाई करत असाल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे बद्दल वाईट बोलले आहेत. त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा. अशी मागणी करत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस ठण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत,रंजित देसाई, राजू राऊळ, संध्या तेरसे, राजश्री धुमाळे, दिपलक्ष्मी पडते,अस्मिता बांदेकर, विनायक राणे , रुपेश कानडे,पप्या तवटे, मेघा गांगण, प्रज्ञा ढवण, श्रिया सावंत,सुप्रिया नलावडे,कविता राणे,साक्षी सावंत,प्राची कर्पे,प्रकाश सावंत अण्णा कोदे, परशुराम झगडे,राजा धुरी, बाबू गायकवाड,महेश सावंत,नरेंद्र गावकर,संजय ठाकूर, निकील आचरेकर, वकील विराज भोसले,शिशिर परूळेकर, आनंद घाडीगांवकर, निखिल आचरेकर, स्वाती राणे,साक्षी सावंत, रेखा काणेकर,हर्षदा वाळके, संजना हळदीवे,विजय चिंदरकर सदा चव्हाण,सुमेधा पाताडे,राजू पेडणेकर, गावडे, बाळा गावडे, समर्थ राणे आदी उपस्थित होते.
यावेळी राणे साहेब तुम आगे बढे हम तुम्हारे साथ है!…राणे साहेब आंगर है..! बाकी सब भांगर है..! उद्धव ठाकरे हाय हाय ..! या ठाकरेंचे करायचे काय खाली डोके वर पाय..!
अशा घोषणा दिल्या तर उद्धवा अजब तुझे सरकार ,…लहरी राजा प्रजा आंधळी…! हे गाणे गाऊन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या अटकेच्या कारवाईचा निषेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!