भाजपच्या माईन ग्रामपंचायत सरपंचपदाच्या उमेदवार प्रज्ञा मेस्त्री यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपच्या माईन ग्रामपंचायत सरपंचपदाच्या उमेदवार प्रज्ञा मेस्त्री यांचा शिवसेनेत प्रवेश

*कोकण  Express*

*भाजपच्या माईन ग्रामपंचायत सरपंचपदाच्या उमेदवार प्रज्ञा मेस्त्री यांचा शिवसेनेत प्रवेश*

*आम.नितेश राणेंच्या कारभाराला कंटाळून सेनेत प्रवेश केल्याची कबुली*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील माईन ग्रामपंचायतीच्या भाजपच्या सदस्या असलेल्या प्रज्ञा मेस्त्री यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत आपल्या हाती शिवबंधन बांधून घेतले.यावेळी महिला आघाडी प्रमुख नीलम सावंत पालव व तालुका प्रमुख शैलेश भोगले यांच्या उपस्थितीत यासर्वानी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, उपतालुका प्रमुख भालचंद्र दळवी,सचिन सावंत,भास्कर राणे,संदेश पटेल,अँड हर्षद गावडे,रामू विखाळे, सचिन आचरेकर,सुदाम तेली,उपविभाग प्रमुख बाबू घाडी, राणे,सुनील पारकर,शरद वायगणकर,अरविंद राणे,गोट्या कळसुलकर,दादा भोगले,व्यकटेश वारंग,आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आम नितेश राणेंच्या कार्यपद्धतीला कंटाळून तसेच गावातील रखडलेल्या विकासकामामुळे आम्ही शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.काहीनी गावच्या विकासात आडकाठी केल्यामुळे तसेच ग्रा.प.च्या कारभारात हस्तक्षेप करत ग्रामस्थांना व सदस्यांना विश्वासात घेतले नाही.तसेच शिवसेनेच्या माध्यमातून अनेक विकास कामे गावात होत असून ती मार्गी देखील लागली आहेत.या कारणामुळे भाजपची साथ सोडल्याचे शाखा प्रमुख बाबू घाडी यांनी सांगितले. यावेळी ग्रा.प.सदस्या प्रज्ञा मेस्त्री यांच्या समवेत गणेश बाणे, सचिन बाणे, संतोष बाणे, एकनाथ बाणे, संतोष बाणे, वसंत चव्हाण, संदीप घाडीगांवकर, दयानंद राणे, पंकज राणे, गणपत बाणे, गणेश आडेलकर, रविंद्र घाडीगांवकर, किशोर घाडीगांवकर, कृष्णा घाडीगांवकर, सागर घाडीगांवकर, पंकज घाडीगांवकर, रंजित घाडीगांवकर, धोंडू गवाणकर, सुनिल गवाणकर, सखाराम बाणे, मनोहर घाडीगांवकर, सत्यवान गावकर, दिपक गावकर, संदीप गावकर, प्रसाद घाडीगांवकर, सागर पाडावे, मिलिंद बिर्जे, दीपक बाईत, रोशन बाईत, रुतिक बाईत, किरण मेस्त्री, संकेत मेस्त्री, सुनिल मेस्त्री, सुभाष मेस्त्री, ओंकार बाईत, निखिल हातणकर, आबा बाईत, गुरुनाथ मेस्त्री, भिकाजी बिर्जे, संदीप बिर्जे, दशरथ बिर्जे, दर्शना बिर्जे, सुधीर आडेलकर, संतोष आडेलकर, महेश घाडीगांवकर, अजय घाडीगावकर आदींनी सेनेत प्रवेश केला.प्रवेशा नंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!