*कोकण Express*
*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून सावंतवाडी भाजप आक्रमक*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी येथे अटक केल्यानंतर त्याचे पडसाद सावंतवाडी शहरात उमटले आहेत. नगराध्यक्ष संजू परब आणि भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वखाली भाजप पदाधिकारी आक्रमक झाले असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोखून ठेवला आहे.