*कोकण Express*
*जन आशीर्वाद यात्रा आज थांबली आहे त्याचे रूपांतर आंदोलनात*
*जोपर्यंत नारायण राणे यांची सुटका होत नाही तोपर्यंत कोकण गप्प बसणार नाही*
*भाजपचे प्रवक्ते तथा माजी आमदार प्रमोद जठार यांचा इशारा*
जोपर्यंत नारायण राणे यांची सुटका होत नाही तोपर्यंत कोकण गप्प बसणार नाही. जन आशीर्वाद यात्रा आज या ठिकाणी थांबली आहे त्याचे रूपांतर आंदोलनात झाले आहे, असा इशारा भाजपचे प्रवक्ते तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला. दरम्यान याच संगमेश्वरात संभाजी महाराजांना कुटिल डाव हाणुन अटक करण्यात आली होती त्याचप्रमाणे राणेंना अटक केली त्यामुळे औरंगजेबाचे सरकार खालसा झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. राणे यांना अटक झाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारकडून राणेंवर अटकेची झालेले कारवाई चुकीची असल्याचे म्हटले तसेच जन आशीर्वाद यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून राणे यांची सुटका झाल्यानंतर आपण ती पुन्हा सुरू करू असे ते म्हणाले.