*कोकण Express*
*रत्नागिरी*
अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना संगमेश्वर येथे पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिकांनी राणेंविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता. राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यासाठी खुद्द रत्नागिरीचे एसपी राणेंना अटक करण्यासाठी संगमेश्वर येथे पोहोचले आणि राणेंना अटक करण्यात आली. परंतु पोलिसांकडे कोणतेही अटक वॉरंट नसल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी दिली आहे. राणेंची बीपी आणि शुगर वाढल्यामुळे राणेंची वैद्यकीय तपासणी सुरु झाली आहे. राणे रुग्णालयात दाखल होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. एकंदर, संगमेश्वर मधील वातावरण अतिशय गरम झाले असून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.