*कोकण Express*
*कुडाळात राणेंच्या विरोधात घोषणाबाजी!*
*प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात कुडाळ शिवसेना शाखा येथे युवासेनेने आंदोलन केले. यावेळी युवासेनेने राणेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कुडाळ येथे आंदोलकांकडून राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडत आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनवर नेले.