*कोकण Express*
*राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या व्यक्तव्याचे कणकवली जोरदार पडसाद उमटले असून नारायण राणे यांच्या विरोधात कणकवली येथील शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुतळा हिसकावून घेतला मात्र यावेळी पोलीस व शिवसैनिकांमध्ये बाचाबाची व झटापट झाली. शिवसेना भाजपा मध्ये मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी येथे जोरदार वादावादी सुरू असताना कणकवली तालुका शिवसेनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत राणेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली.त्यानंतर शिवसैनिक कणकवली सेना शाखेजवळ एकवटले व त्यांनी राणेंविरोधात घोषणाबाजी सुरू करत राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला.यावेळी येथे तैनात असलेल्या पोलिसांनी हा पुतळा हिसकावून घेतला. यामुळे संतप्त शिवसैनिक व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली.त्यानंतर ही शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत राणेंवर कारवाईची मागणी केली.