*कोकण Express*
*शेतकऱ्यांचे हित, व्यथा जाणून शेतकऱ्यांचा फायदा करुन देणारे ठाकरे सरकार ना.सामंत*
*देवगड ः अनिकेत तर्फे*
तौक्ते चक्रीवादळामध्ये सर्वाधिक नुकसान हे कोकणातील मच्छिमार,आंबा बागयतदारव शेतक-यांचे झाले होते. या नुकसानग्रस्त मच्छिमार व शेतक-यांना आतापर्यत नुकसान भरपाई उध्दव ठाकरे सरकारने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हित शेतकऱ्यांची व्यथा व शेतकऱ्यांची नुकसानी जाणून शेतकऱ्यांचे फायदा करुन देणारे हे ठाकरे सरकार असल्याचे मत पालकमंत्री उदय सामंत यांनी देवगड येथील तौक्ते चक्रीवादळातील नुकसान ग्रस्तमच्छिमारांना धनादेश सुपुर्त करतेवेळी व्यक्त केले. देवगड मच्छिमार लिलाव सेंटरच्या शेडमध्ये तौक्ते चक्रीवादळामधील नुकसान ग्रस्त लाभार्थी मच्छिमारांना धनादेश देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक,सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष् सतिश सावंत,जिल्हाध्यक्ष् संजय पडते,अतुल रावराणे,नंदुशेठ घाटे,महिला आघाडी प्रमुख निलम सावंत-पालव,जान्हवी सावंत,तालुका प्रमुख विलास साळसकर,मिलिंद साटम,उपतालुका प्रमुख बुवा तारी,विभाग प्रमुख तुषार पेडणेकर,शहर अध्यक्ष् संतोष तारी,मच्छिमार सोसायटीचे पदाधिकारी व मच्छिमार बांधव उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले की,तौक्ते चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौरा केला होता. या दौ-यामधील नुकसान ग्रस्त् भागाची व मच्छिमार बांधवांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करुन प्रशासनाला वस्तुस्थितीनुसार तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देवून ते शासनाकडे सादर करण्यासाठी देखील सांगण्यात आले. तर शासनाकडे नुकसान भरपाईचे पंचनामे सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री यांनी कोटयावधी रुपयांचे पॅकेज कोकणसाठी जाहीर केले. आता पर्यंत मच्छिमार बागायतदार शेतक-यांना तुटपुंजीच नुकसान भरपाई मिळत होती. मात्र ठाकरे सरकारने सर्वाधिक नुकसान भरपाई तौक्ते चक्रीवादळातील नुकसान ग्रस्तांना दिली आहे. एलईडी मच्छिमार व पर्ससीन नेट ची मच्छिमारी बाबत शासनाने समिती नेमली असून या समितीच्या बैठकिमध्ये आपणाला निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकिमध्ये एलईडी मच्छिमारी बंद करा म्हणून आपण सांगितले आहे. वायफळ पत्रकार घेवून चर्चा करणारे अनेक नेते आहेत. मात्र आपण प्रत्यक्ष समितीच्या बैठकिमध्ये मच्छिमारांना न्याय मिळण्यासाठी एलईडी मच्छिमारीबददल विरोध दर्शविला आहे. यामुळे शेतकरी मच्छिमार बांधवांचे हित जोपासने हेच शिवसेनेचे काम आहे. राजकारणापेक्षा समाजकारण करुन आज शिवसेना पक्षाने विकास कामांवरती भर दिला आहे. कुणकेश्वर व आंगणेवाडी या तिर्थक्षेत्रांना महाविकास आघाडी सरकारने तेथील विकासाठी कोटयावधी रुपयांचा निधी दिला आहे हा निधी बहुतांश प्रमाणात खर्च देखील झाला आहे. यामुळे या महाविकास आघाडी सरकारवरती कुणकेश्वर व आंगणेवाडीची कृपादृष्टी आहे. यामुळे कितीही कोणीही या सरकारच्या विरोधात खोटेनाटे आरोप केले तरी हे सरकार अभेध राहून गोरगरीब जनतेला केंद्रबिंदु ठेवून विकास करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.एलईडीव पर्ससीनच्या मच्छिबांधवांकडून आपण पैसे घेतल्याचे आरोप होत आहेत. मात्र असे आरोप राणे कुटुंबियांनी सिध्द करावे सिध्द झाल्यास मी राजकारण सोडून देईन असा टोला देखील पालकमंत्री सामंत यांनी लगावला फोटो-तौक्ते चक्रीवादळामधील नुकसान ग्रस्त् मच्छिमारांना धनादेश वाटप करतेवेळी पालकमंत्री उदय सामंत.छाया-वैभव केळकर