*कोकण Express*
*शहरात डेंग्यू आणि मलेरियाचे सापडले चार रुग्ण*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण शहर परिसरात डेंग्यू व मलेरियाचे चार रुग्ण सापडून आले. त्या परिसरातील नागरीकांची रक्त व अन्य तपासणी करण्यात आली. सर्व नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे. मालवणात डेंग्यू व मलेरिया सदृश्य रुग्ण सापडून आल्याने मालवण नगरपालिकेच्या वतीने शहारात डास फवारणी मोहीम व अन्य उपाययोजना सुरू आहेत. नागरिकांनीही घराच्या परिसरात पाणी साचून डास उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्या. आणि मालवणला मलेरिया मुक्त होण्यासाठी मदत करा असे आवाहन नगराध्यक्ष यांनी केलं आहे. दरम्यान, मालवणात सापडलेले डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण अन्य जिल्हयातून व अन्य राज्यातून मालवणात आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. बालाजी पाटील यांनी दिली आहे.