*कोकण Express*
*बंद कणकवली दूध योजनेतील बंद नवीन मशिनरीची मनसेने केली प्रतिकात्मक पूजा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवलीतील वागदे येथील शासकीय योजनांमध्ये नव्याने आलेल्या सुमारे सात लक्ष रुपयांच्या नवीन सीटीबीटी युनिटच्या इलेक्ट्रिकल मशीनची मनसेतर्फे पूजा करण्यात आली. मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, उपशहर अध्यक्ष शरद सावंत, विभाग अध्यक्ष दत्ताराम अमृते यांच्या उपस्थितीत करण्यात ही पुजा करण्यात आली. कणकवली शासकीय दूध योजना ही सन 2015 पासून पूर्णपणे बंद आहे. तरीही सुमारे सात ते आठ लक्ष रुपये किमतीचे ट्रांसफार्मर इलेक्ट्रिकल सीटीबीटी युनिट खरेदी करून का पाठविण्यात आले याची खाते स्तरावरून चौकशी करण्यात यावी अशी मागणी दया मेस्त्री यांनी केली आहे .योजना बंद असल्यापासून दरमहा 40 ते 50 हजार रुपयांचे हायटेन्शनचे थ्री फेज कनेक्शन लाईट बिल राहिल्यामुळे दुग्ध शाळेचे विद्युत कनेक्शन तोडण्यात आले होते. सद्यस्थितीत या शासकीय दूध योजनामध्ये दोन पहारेकरी काम करीत आहेत. कार्यालयीन अधीक्षक व लिपिक रत्नागिरी जिल्हा दुग्ध विकास कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत असून त्यांच्यावर योजनेतील कामकाजाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. परंतु मनसेतर्फे आम्ही तीन ते चार वेळा योजनेत माहिती घेण्यासाठी गेलो असता कुणीही उपस्थित नव्हते. बंद दुग्ध शाळेची गेल्या सहा महिन्यापासून धूळ खात पडलेली हे नवीन मशीन भंगारात काढण्याची अधिकाऱ्यांची मानसिकता असल्याचे यातून दिसते. परंतु जिल्ह्यातील दुग्ध सहकारी संघ योजना पूर्ववत चालू करण्यासा आवाज उठवताना दिसत नाही. कारण जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघातर्फे दूध गोळा करून कोल्हापूरच्या प्रतिभा डेअरी या खाजगी डेअरीला दूध घातल्या प्रकरणी संस्थांचे सुमारे 2 कोटी 50 लाख रुपये गेली तीन वर्ष थकीत आहे .याबाबत दुग्ध खात्याचे अधिकारी मूग गिळून गप्प आहेत .याशिवाय दूध वितरकांकडून याची वसुली का केली जात नाही.जिल्हा दुग्ध विकास अधिकारी आवटे हे गेले सहा महिने जिल्ह्यात आलेले नाहीत तर मग जिल्ह्यातील दुग्ध संस्था व विकास कसा काय होणार याची दखल पालकमंत्री का घेत नाहीत? जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार आणि पालकमंत्री बंद पडलेल्या दूध डेअरीकडे सुतराम लक्ष देत नाही त्याचा मनसेतर्फे निषेध करीत आहोत.म्हणूनच मनसेतर्फे लवकरच आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व दुग्ध सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मनसेशी थेट संपर्क साधावा. मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांच्या संपर्क कार्यालयात जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी याबाबत संपर्क करण्याचे आवाहन दया मेस्त्री यांनी केले आहे.