*कोकण Express*
*महिला ही देणार आता ‘एनडीए’ची परिक्षा; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय*
महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएची परिक्षा द्यायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. येत्या ५ सप्टेंबरला ही परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यार आले आहे.
न्यायाधीश संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती हृषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने सांगितले की, प्रवेश कोर्टाच्या अंतिम आदेशांच्या अधीन असतील.
सुप्रीम कोर्टाचे वकील कुश कालरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी करण्यात आली. त्यामध्ये
पात्र महिला उमेदवारांना एनडीएमध्ये परीक्षा आणि प्रशिक्षण देण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. कालरा यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, पात्र महिला उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये प्रवेश करण्यापासून स्पष्टपणे वगळणे घटनात्मकदृष्ट्या न्याय्य नाही.
त्यांनी गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीच्या ऐतिहासिक निकालाचा उल्लेख केला होता. ज्यात सर्वोच्च न्यायालयाने लष्करामधील महिला अधिकाऱ्यांना कायम कमिशन आणि कमांड पोस्टिंग देण्याचे निर्देश दिले होते.