सतीश सावंतांनी विकास कामांच्या पोकळ घोषणा करू नये

सतीश सावंतांनी विकास कामांच्या पोकळ घोषणा करू नये

*कोकण Express*

*आमदार,खासदार,पालकमंत्री यापैकी सतीश सावंत कोण?*

*शासनाकडे मंजुरीसाठी रस्त्याच्या आराखड्यावर आमदार-खासदार पालकमंत्री यांच्या सही ची गरज…*

*सतीश सावंतांनी विकास कामांच्या पोकळ घोषणा न करता पुरावे द्यावेत : सुरेश सावंत*

*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून देवगड व वैभववाडी तालुक्‍यातील १२ रस्त्यांच्या
कामासाठी सुमारे ३३ कोटी रूपये आपल्या प्रयत्नाने मंजूर झाले असा दावा सतीश सावंत यांनी केला आहे. हा दावा फोल असल्याचे भाजपा राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून म्हटलं आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची मंजूरीची शासनाने पद्धत ठरवली आहे. त्यामध्ये जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या निधीचे तालुका क्षेत्रफळानुसार वाटप होऊन कितीचा आराखडा बनवायचे हे निश्‍चित करण्यात येते व निकषानुसार रस्ते घेण्यात येतात व तालुक्‍याचा आराखडा बनविण्यात येतो. सदर आराखडा शासनाकडे मंजूरीसाठी पाठविताना त्यावर मतदारससंघाचे आमदार, खासदार. व पालकमंत्री यांच्या सह्या घेण्यात येतात. सतीश सावंत यांपैकी कुणीही नाही म्हणून त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेताना सत्य परिस्थितीचे भान राखले तर बरे होईल. अस सावंत यांनी म्हटलं आहे. जी कामे मी मंजूर केली म्हणून सतीश सावंत गाजावाजा करीत आहेत. ती कामे सन २००१९ / २०२० मधील बॅच २ मधील असून जून २०१९ मध्ये त्यांना मंजूरी देण्यात आली होती. सदर कामांची शिफारस स्थानिक आमदार श्री. नितेशजी राणे यांनी केलेली
होती. परंतु मंजूरीनंतर लागलेली विधानसभेची आचारसंहीता, शासनाकडील निधीची कमतरता तसेच कोरोना महामारीचे संकट यामुळे या कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. एक वर्ष उलटल्याने निविदा प्रक्रिया नव्याने अंदाजपत्रके बनवून व तांत्रिक मान्यता घेऊन करण्यास शासनाने आता मंजूरी दिली आहे. सदर शासन मंजूरी संपूर्ण महाराष्ट्रातील या योजनेतील कामांसाठी असून फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नाही हे सतीश सावंतानी लक्षात घ्यावे. अस सुरेश सावंत यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!