*कोकण Express*
*खास. राऊत यांनी भर पावसात केली खचलेल्या रस्त्याची पाहणी*
*वागदे व कसवणातील ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अतिवृष्टीमुळे वागदे-कसवण रस्ता खचला आहे. या रस्त्याची पाहणी खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी रात्री 8 वा. भर पावसात करत रस्ता वाहतुकीस योग्य बनविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना केल्या.खास. विनायक राऊत यांच्या तत्परतेबद्दल वागदे व कसवणातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. खास. राऊत यांच्या सोबत जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते अतुल रावराणे, जि.प.गटनेते नारेंद्र परब,तालुका प्रमुख शैलेश भोगले,सचिन सावंत, वागदे सरपंच पूजा घाडीगांवकर, उपसरपंच रुपेश आमडोस्कर, ,ग्रा.प.सदस्य सुषमा गोसावी,विजय खरात,उमेश घाडीगांवकर, कसवण शाखा प्रमुख विलास सावंत,सतीश गुरव,शिरीष घाडीगावकर,केशव घाडीगावकर, शरद सरंगले,आबा मुंज वागदे ग्रामस्थ उपस्थितीत होते. कणकवलीत वागदे-कसवण-तळवडे रस्ता खचला व वाहतुकीला बंद झाला होता. परंतु पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरुपाचा रस्ता तयार करून छोट्या वाहनांना वाहतुकीला मोकला केला. परंतु एसटी वाहतूक बंद असल्यामुळे पंचक्रोशीतील लोकांना येण्या-जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, खासदार राऊत यांनी रस्त्याअभावी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी डेप्युटी इंजिनिअर विनायक जोशी,ज्युनिअर इंजिनिअर राहुल पवार यांना हा रस्ता त्वरित वाहतूक योग्य बनविण्याची सूचना केली.