*कोकण Express*
*वैभववाडी तालुक्यातील प्रमुख मार्गांची अवस्था दयनीय;रस्त्यांवर खड्डेच खड्डे*
*वैभववाडी ःप्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्यातील प्रमुख मार्गांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.उंबर्डे – एडगाव व करूळ – वैभववाडी हे दोन रस्त्यांवर ठीकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यावरुन वाहतुक करणे धोकादायक आहे.या रस्त्यावर खडी टाकून तत्काळ दुरुस्ती करावी,या मागणीचे निवेदन वैभववाडी तालुका काँग्रेसच्यावतीने उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभागीय, वैभववाडी यांना दिले आहे. या वर्षी पावसाळ्यात वैभववाडी तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडला आहे.त्यामुळे वैभववाडी – उंबर्डे – एडगांव ,वैभववाडी – करूळ या दोन रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य पसरले आहेत.अक्षरशः रस्त्यांची चाळन झाली आहे. सदर रस्त्यावरून वाहने चालविणे धोकादायक झाले आहे तसेच नागरिकांना देखील रस्त्यावरून चालले आहे कठीण बनले आहे. तसेच वाहन चालकांना देखील वाहने चालविणे खूपच त्रासदायक झाले आहे .सदर रस्त्यावरील खड्डे चिऱ्याच्या मातीने बुजवून रस्त्यांची योग्य डागडुजी करावी,सध्या रस्त्यावर अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे, या विषयाबाबत आपल्या कार्यालयाला वेळोवेळी निवेदने देऊन कळविले आहे. तरी वरील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी,अन्यथा आपणास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल ,असे निवेदन वैभववाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादामिया पाटणकर ,तालुका उपाध्यक्ष वसंत नाटेकर ,तालुका सेवादल अध्यक्ष अशोक राणे, महिला तालुकाध्यक्ष मीनाताई बोडके,भारती कुडतरकर यांनी दिले आहे.