विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून आपले‌ करीअर ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ घडवा – सचिन कोर्लेकर

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून आपले‌ करीअर ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ घडवा – सचिन कोर्लेकर

*कोकण Express*

*विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून आपले‌ करीअर ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ घडवा – सचिन कोर्लेकर*

*शिरवल ग्रामस्थांनी सरकारी नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्र शिरवल गावात सुरु करुन समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला*

*कणकवली ः प्रतिनिधी*

विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि ‌करीअरच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी आणि स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्लासेसची‌ गरज आहे.आपल्या गावातील होतकरु गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि सरकारी नोकरी विषयक मार्गदर्शन मिळावे म्हणून‌‌ शिरवल ग्रामस्थांनी सरकारी नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्र शिरवल गावात सुरु करुन समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. असे‌ गौरवोद्गार युनिक अँकॅडमी शाखा कणकवलीचे शाखा व्यवस्थापक‌ श्री.सचिन कोर्लेकर यांनी काढले.स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे असे‌ही त्यांनी सांगितले.
ते शिरवल टेंबवाडी येथे श्री.विठ्ठल-रखुमाई‌ मंदिर येथे ‌सरकारी नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.यावेळी शिल्पकार क्लासेस नामफलकाचे फित कापून त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय समितीचे जिल्हाध्यक्ष श्री. ह.भ.प.विश्वनाथ‌ गंवडळकर, नाट्य अभिनेते महेश सावंत, पोलिस पाटील विजय शिरवलकर,सुनील कुडतरकर.सुर्यकांत‌ सावंत, बाळकृष्ण कुडतरकर,तुळशीदास कुडतरकर, ओमकार सावंत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.कोर्लेकर म्हणाले की,शिरवल गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलीस दलात अधिकारी असलेले एपी.आय.दयानंद सावंत,श्री.विठ्ठल-रखुमाई मंदिर समिती शिरवल आणि ग्रामस्थांनी गावातील होतकरु आणि गरजु विद्यार्थ्यांना “शिल्पकार”क्लासेसच्या माध्यमातून तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन दर रविवारी उपलब्ध करुन दिले आहे. या मार्गदर्शन केंद्रातुन पोलिस भरती, तलाठी, ग्रामसेवक,व अन्य नोकर भरती संदर्भात, तसेच महाराष्ट्र राज्य सेवा क्षेत्रात सक्षम व उच्चशिक्षित अधिकारी घडविण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.

सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे.स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्या.युपीएससी आणि एमपीएससी सिलॅबस फाॅलो करा.युपीएससी आणि एमपीएससी बघताना मोठे ध्येय ठेवा.सकारात्मक मानसिकता ठेवा आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकांचा अभ्यास करा.आणि आपले करीअर घडवा.असे मार्गदर्शन केले.
ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर मार्गदर्शन करताना म्हणाले कि, सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे.विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षा आणि करीअर मार्गदर्शन मिळावे म्हणून प्रत्येक रविवारी श्री.विठ्ठल-रखुमाई मंदिर शिरवल येथे “शिल्पकार” क्लासेस मधुन तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन दुपारी दोन ते चार या वेळेत ठेवले आहे. या मार्गदर्शन क्लासेस चा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
‌‌ गावातील होतकरू मुलांच्या करिअरसाठी शिल्पकार क्लासेस सुरू करण्यात आला असून गावातील ग्रामस्थ ,पोलीस अधिकारी दयानंद सावंत, श्री विठ्ठल रखुमाई सेवा समितीने पुढाकार घेऊन गावातील होतकरू विद्यार्थ्यांना एक चांगले व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करुन आपली शैक्षणिक प्रगती क्लासेस मधून करावी आणि चांगले अधिकारी बनावे .असे मार्गदर्शन ह. भ. प .विश्वनाथ गंवडळकर यांनी केले.

सुनिल कुडतरकर ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌ मार्गदर्शन करताना म्हणाले की, सध्याचे युग हे स्पर्धा परीक्षेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे शिल्पकार क्लासेस सुरु केला आहे. या क्लासेस मधून विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामधून तुमचा व्यक्तिमत्व विकास निश्चित होईल आणि त्याचा लाभ प्रत्येक क्षेत्रात होईल. निर्णय कौशल्य प्राप्त होईल .या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातल्या क्लासेस मधून केलेल्या अभ्यासाचा आणि घेतलेल्या परिश्रमाचा फायदा भविष्यात तुम्हाला करीअर करताना होईल. आजच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी प्रयत्न करणे हे आपल्याच हाती असून ती आपली जबाबदारी आहे.म्हणूनच मार्गदर्शन वर्गांचे आयोजन केले आहे. म्हणूनच तुम्ही विद्यार्थ्यांनी नोकरीविषयक आणि स्पर्धा परीक्षेविषयी मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्या. आणि स्पर्धा परीक्षा देऊन क्लासवन अधिकारी बनून शिरवल गावाचे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल करा.असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले
यावेळी ह.भ. प विश्वनाथ गंवडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत युनिक ॲकॅडमी कणकवलीचे व्यवस्थापक सचिन कोर्लेकर यांच्या हस्ते शिल्पकार क्लासेसच्या फलकाचे पुष्पहार घालून नामकरण करण्यात आले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!