महाविद्यालयाचे प्रथम वर्ष म्हणजे इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया आज दि. 14 पासुन सुरु होत आहे. त्यासाठी विध्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. असे राज्य सरकारने जाहीर केले आहे.विद्यार्थ्यांनी https://11thadmission.org.in या संकेस्थळावरुन प्रवेशासाठीच्या अर्जाचा पहिला भाग भरुन प्रवेशासाठी नोंदणी करायची आहे. त्यानंतर या अर्जाचा दुसरा भाग १७ ते २२ ऑगस्ट दरम्यान भरायचा आहे. महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी २७ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना मिळलेल्या महाविद्यालयात ३० ऑगस्टपर्यंत आपला प्रवेश निश्चित करावा लागेल. तदनंतर प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीसाठी ३० ऑगस्टलाच रिकाम्या जागांची यादी जाहीर होईल. अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
