आमदार नितेश राणेंनी केवळ शब्द देऊन न बसता करून  दाखवलं

आमदार नितेश राणेंनी केवळ शब्द देऊन न बसता करून  दाखवलं

*कोकण  Express*

*आमदार नितेश राणेंनी केवळ शब्द देऊन न बसता करून  दाखवलं*

*पालकमंत्री उदय सामंत यांनी सरपंचांना दिलेल्या आश्वासनाला असमर्थ ठरले*

*आ. नितेश राणे यांनी भाजपाचा की अन्य विरोधी पक्षाचा सरपंच असा भेदभाव न करता सर्वपक्षीय 169 सरपंचांना दिले आरोग्य विमा पॉलिसीचे कवच*

*कणकवली ः संंजना हळदिवे*

कोरोना साथरोगात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या गावातील ग्रामस्थांची अहोरात्र काळजी घेणाऱ्या सरपंचांना अत्यावश्यक असे आरोग्य विमा संरक्षण देत केवळ बोलून नाही तर भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्यक्षात करून दाखवलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन उपस्थितीत कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यांतील एकूण 169 सरपंचांना साडेसात लाख रुपयांचे कव्हर देणारी मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आमदार नितेश राणे यांनी आज प्रहार भवन येथे प्रदान केली. कोरोनाच्या साथरोगात लढत असताना राज्यसरकार आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने मागणी करूनही सरपंचांना मेडिकल इन्श्युरन्स कव्हर दिले जात नव्हते. पालकमंत्री उदय सामंत यांनी तर राज्य सरकारने न दिल्यास सरपंचांना स्वखर्चाने इन्शुरन्स पॉलिसी देणार असा शब्द सरपंचांना दिला होता. मात्र पालकमंत्र्यांनी हा शब्द पाळला नाही. मात्र आमदार नितेश राणे यांनी भाजपाचा की अन्य विरोधी पक्षाचा सरपंच असा भेदभाव न करता सेवाभाव हेच संघटन हा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचा आदेश प्रमाण मानून जनसेवेसाठी आपला जीव तळहातावर घेऊन झटणाऱ्या कणकवली तालुक्यातील सर्वपक्षीय 169 सरपंचांना साडेसात लाख रुपयांचे मेडिकल उपचाराचे बेनिफिट देणारी मेडिकल पॉलिसी इन्शुरन्स पॉलिसी स्वखर्चाने दिली.

यावेळी बोलताना आमदार नितेश म्हणाले की राज्यशासन आणि पालकमंत्र्यांकडे विमा संरक्षणाबाबत वारंवार मागणी करूनही सरपंचाच्या हाती काहीच पडले नाही. कोरोनाशी लढा देताना सर्व ग्रामकमिटी सोबत सरपंच पुढे असतो. कोरोनामुळे कणकवली तालुक्यातील भरणी गावच्या सरपंच गुरव यांचे निधनही झाले. सरपंचांना ताकद देण्याचे काम राज्य सरकारचे होते. मात्र केवळ कोरोना योद्धा म्हणून शाब्दीक कौतुक करून सरकारने आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी सरपंचाची बोळवण केली. सरपंचांना विमा संरक्षण देने हे आमचे कर्तव्य आहे. याच भावनेतून आज हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी देत आहे. आमदार नितेश यांनी चोलामंडल कंपनीचा तब्बल 17 फायदे असणारा आणि सर्व प्रकारच्या रोग निदान तपासणी पासून ते वैद्यकीय उपचारापर्यंत कॅशलेस सुविधा देणारा विमा सरपंचांना दिला आहे. महाराष्ट्रातील हजार 817 हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या रोगांवर या विमा पॉलिसीमुळे साडे सात लाख रुपयांपर्यंत चे वैद्यकीय उपचार, ऑपरेशन्स मोफत होणार आहेत. तसेच चोलामंडल कंपनीच्या नेटवर्क बाहेरील हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यास त्याचे पैसेही रिफंड मिळणार आहेत. राज्य सरकारने आमची व्यथा नाही ऐकली तरी आमदार नितेश राणे यांनी आम्हाला विमा संरक्षण देऊन कोरोनाच्या साथरोगात काम करताना मोठा आधार आम्हाला दिला असल्याची प्रतिक्रिया सरपंचांच्या वतीने संतोष किंजवडेकर आणि संतोष कानडे यांनी व्यक्त केली.

देवगड, कणकवली आणि वैभववाडी तालुका सरपंच संघटनेच्या वतीने आमदार नितेश राणेंचा कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केले. आभार वैभववाडी पं. स. चे उपसभापती अरविंद रावराणे यांनी मानले. यावेळी जि. प. अध्यक्षा संजना सावंत, जि. प. सभापती शर्वानी गावकर, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, कणकवली पं. स. सभापती मनोज रावराणे, देवगड पं. स. सभापती रवी पाळेकर, वैभववाडी पं. स. उपसभापती अरविंद रावराणे, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, देवगड तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, संतोष किंजवडेकर, सरपंच संघटना अध्यक्ष संतोष राणे, तसेच कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील सरपंच उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!