*कोकण Express*
*थकीत रक्कम भरणाऱ्यांना सवलतीच्या दरात पुन्हा खावटी कर्ज मिळणार!*
*सोसायट्यांकडून केवळ 500 रुपयांच्या बॉण्डवर 10 लाखांचे गृहकर्ज!*
*जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची पत्रकार परिषदेत माहिती…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत सोसायटीच्या खावटी कर्जमाफीसाठी 7 हजार 773 शेतकरी पात्र असून 12 कोटी 73 लाख रुपयांचे कर्जमाफ होणार आहे. 1 ऑगस्ट 2017 पासून 8 हजार 362 शेतकऱ्यांनी खावटी कर्ज घेतले. हे सर्व 8 हजार 362 हजार शेतकरी खावटी कर्जमाफीस पात्र नाही. मागील 3 वर्षांपासून हे कर्ज थकीत आहे. जे शेतकरी ऑगस्ट 2021 पर्यंत थकीत कर्ज फेडतील त्यांना नव्याने सोसायटी मार्फत केवळ 9 टक्के दराने खावटी कर्ज मिळेल. यानुसार जिल्हा बँक शेतकऱ्यांना कर्जावर 5 टक्के सवलत देत असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली .
कणकवली येथे जिल्हा बँकेच्या शहर शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, यापुढे सहहिस्सेदारांची संमती नसली तरी शेती कर्जपासून वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक हीश्या पुरता बोजा ठेवून कर्ज देण्यासंदर्भात विचार सुरू आहे. यासंदर्भात तलाठ्यना तसे आदेश देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात येणार आहे. तसेच सभासद मृत्यू झाल्यावर त्याचा वारस तपास करून वारसांना कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. 2018-19 आणि 2019-20 मधील शेतकऱ्यांच्या कर्जावरील मिळणारे पंजाबराव देशमुख कृषी व्याजात सवलत योजने अंतर्गत 6 % व्याज अनुदान अद्याप मिळालेले नाही. ऑगस्ट महिन्यातील जिल्हा बँक संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत आमचा शासन स्तरावर देखील पाठपुरावा सुरू आहे.
आता सोसायट्यांकडून गृहकर्ज गृहकर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला मॉर्गजसाठी 15 हजार खर्च येतो. यापुढे जिल्ह्यातील 216 सोसायट्यांकडून शेती कर्जपासून वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर बोजा ठेवून कर्ज देण्यासंदर्भात विचार सुरू आहे. यापुढे जिल्ह्यातील 226 सोसायट्यांकडून केवळ 500 रुपयांच्या बॉण्डवर 10 लाखांचे कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना द्यावी लागणारी 14 हजार 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी देखील वाचणार आहे. पंधरा वर्षाच्या मुदतीसाठी हे कर्ज असणार आहे. 1 ऑगस्ट पासून याची जिल्ह्यात अंमलबजावणी झाली असल्याचे सतीश सावंत म्हणाले.