*कोकण Express*
*कथक विशारद पूर्ण परिक्षेत गौरी कामत, मानसी मसुरकरचे सुयश*
नुपूर कला मंदिर या कथक नृत्य वर्गाच्या गौरी कामत व मानसी मसुरकर दोन विद्यार्थिनी कथक विशारद पूर्ण या परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात येणार्या कथक नृत्यमधील प्रारंभिक परिक्षा या दोघींनी 2011 साली दिली होती. त्यानंतरचा त्यांचा कथक नृत्याचा प्रवास यशस्वी होण्यासाठी त्यांनी नृत्यसाधना केली. कोविडकालावधीमध्ये परिक्षा आणि रियाज होऊ न शकल्यामुळे विशारद पूर्ण होण्यास 2021 साल उजाडले. कथक नृत्याच्या या 10 वर्षांच्या यशस्वी प्रवासात या दोघींनीही नुपूर कलामंदिरच्या संचालिका अनुजा गांधी गुरू म्हणून लाभल्या. त्यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे त्यांचा हा प्रवास यशस्वी झाल्याचे गौरी आणि मानसी म्हणाल्या. तसेच अमित आणि अतुल या उमळकरबंधूंचे मोलाचे सहकार्य वाद्यसाथीसाठी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कथकमधील पुढील वाटचाल अशीच चालू ठेवणार असून कथकचा प्रसार आणि प्रचार जास्तीत जास्त व्हावा यासाठीही गौरी आणि मानसी या प्रयत्नशील आहेत.