*कोकण Express*
*ठाकर समाजाने आपली संस्कृती जपावी:पद्मश्री परशुराम गंगावणे*
*आशिये-ठाकरवाडी येथे समाजमंदिराचे लोकार्पण*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गातील ठाकर समाजबांंधवांनी आपली संस्कृती जपली पाहिजे. तसेच समाज बांधवांनी एकसंध राहून समाजाला पुढे नेले पाहिजे. लोककला ही ठाकर समाजाची संस्कृती असून राधानृत्याचे महत्त्व प्रत्येक समाज बांधवाने समजून घ्यावे, असे आवाहन पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले. जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आशिये-ठाकरवाडी येथे महापुरुष मित्रमंडळाने उभारलेल्या समाज मंदिराचे लोकार्पण श्री. गंगावणे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज संघटनेचे अध्यक्ष भगवान रणसिंग, माजी उपसभापती महेश गुरव, आशिये उपसरपंच संदीप जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज संघटनेचे माजी अध्यक्ष नीलेश ठाकूर, कणकवली तालुकाध्यक्ष वैभव ठाकूर, मालवण तालुकाध्यक्ष रुपेश गरूड, कोषाध्यक्ष विजय ठाकर, सचिव दिलीप मसके, सल्लागार नामदेव ठाकर, महापुरुष मंडळाचे अध्यक्ष उमेश ठाकूर, विठोबा ठाकूर, प्रताप ठाकर, रमेश रणशूर, साईनाथ यादव, विठ्ठल सिंगनाथ, दत्तगुरू आटक, मिलिंद करंबेळकर, ग्रा. पं. सदस्य शर्मिला गवाणकर, समीरा ठाकूर, प्रवीण ठाकूर, ग्रामसेवक राकेश गोवळकर, अनिल ठाकूर, संदानंद ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. महापुरुष मित्रमंडळाने उभारलेले समाज मंदिर जिल्ह्यातील ठाकर समाजासाठी आदर्शवत ठरेल. तसेच समाज मंदिर उभारण्यासाठी महापुरुष मंडळाच्या सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल महेश गुरव यांनी सदस्यांचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांचे सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुरगौरव करण्यात आला. यावेळी समाजाच्यावतीने मिलिंद करंबेळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आरंभी आदिवासी समाजाचे जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज गवाणकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रवीण ठाकूर यांनी केले.