*कोकण Express*
*कुडाळात शिवसेनेला धक्का,पंचायत समिती सभापती भाजपात…*
*नुतन आईरांसह,नागेश आईरांचा भाजपा प्रवेश*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
शिवसेनेच्या कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नुतन आईर यांनी आज भाजपात प्रवेश केला.त्यांच्यासह तुळसूली सरपंच नागेश आईर हे सुध्दा प्रवेशकर्ते झाले आहेत.
यासाठी आमदार तथा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी प्रयत्न केले असून,हे दोन्ही प्रवेश शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना धक्का देणारे आहेत.कणकवली येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या निवासस्थांनी हे दोन्ही प्रवेश घेण्यात आले.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याह माजी जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई,माजी नगराध्यक्ष विनायक राणे,महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे,दादा साईल,दिपक नारकर,नगरसेवक राकेश कांदे,संतोष कांदे राजन चिके,सोनू सावंत,संदिप सावंत,अरविंद परब,संदेश नाईक सर्वेश वर्दम,सुनिल बांदेकर,पप्या तवटे आदी उपस्थित होते.