*कोकण Express*
*तोंडवली गावात होणार लसीकरण मोहीम*
*शिवसेनेतर्फे कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राला निवेदन पत्र*
*कणकवली ः प्रतिनिधी*
प्राथमिक आरोग्य केंद्र कासार्डे व उपकेंद्र वाघेरी अंतर्गत येणाऱ्या तोंडवली गावात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात यावी या साठी तोंडवली मधील शिवसैनिक आणि पदाधिकारी यांनी कासार्डे आरोग्य केंद्राला निवेदन पत्र दिले.
तोंडवली गावातील ग्रामस्थांना लसीकरणासाठी वाघेरी आणि कासार्डे केंद्रावर जावं लागतं हे अंतर तोंडवली गावापासून 10 ते 12 किलोमीटर आहे आणि सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक देखील कमी प्रमाणात असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत त्या मुळे कोणी लस घ्यायला जात नसल्याने तोंडवली गावातच लसीकरण मोहीम राबवून 200 लसीचे डोस उपलब्ध करून घ्यावे अस मत युवासेना उपतालुका प्रमुख प्रकाश मेस्त्री यांनी मांडल.
या वेळी युवासेना उपतालुका प्रमुख प्रकाश मेस्त्री,माजी सरपंच नाडकरी,तोंडवली शाखा प्रमुख सुनील पवार , मा .ग्रा.सदस्य तात्या निकम,मा. ग्रा.सदस्य दीपक कांडर, युवासेना शाखाप्रमुख अमित इस्वालकर,चंद्रकांत बोभाटे इत्यादी उपस्थित होते.