चिपी विमानतळाचे उद्घाटन महिन्याभरात

चिपी विमानतळाचे उद्घाटन महिन्याभरात

*कोकण Express*

*चिपी विमानतळाचे उद्घाटन महिन्याभरात !*

*केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती*

* केंद्र सरकारची परवानगी लवकरच*

* विमानतळाचे संस्थापक ना. नारायण राणे यांनी केली होती पायाभरणी आता उद्घाटनही तेच करणार*

*नवी दिल्ली*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपीविमानतळाला केंद्रसरकारची लवकरच परवानगी देण्यात येईल. अशी ग्वाही केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी येथे दिली. त्यामुळे विमानतळाला केंद्रसरकारची परवानगी मिळाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येत्या महिन्याभरात चिपीविमानतळाचे उद्घाटन ना.ज्योतिरादित्य सिंदिया आणि ना. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ना. नारायण राणे यांनीच ही माहिती दिली आहे.
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी हवाई वाहतुक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. आणि चिपी विमानतळाच्या मंजुरी संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी चिपी विमानतळाला केंद्रीय वाहतुक मंत्रालयाची तत्काळा मंजुरी देण्यात येईल अशी ग्वाही ना. राणे यांना दिली. तसेच येत्या महिन्याभरात चिपी विमानतळाचे उद्घाटन करूया आपण स्वत: आपल्यासोबत उद्घाटनास येऊ असेही ना. ज्योतिरादित्य सिंदिया यांनी ना. नारायण राणे यांना सांगितले. गेले अनेक वर्षे रेंगाळलेल्या चिपी विमानतळाचा शुभारंभ आता महिन्याभरात होणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे कोकणवासियांचे विमानतळाचे तसेच विमानप्रवासाचे स्वप्नही आता पूर्ण होणार आहे.
ना. नारायण राणे महाराष्टÑाचे उद्योग मंत्री असताना त्यांनी चिपी विमानतळाला परवानगी देवून बांधा-वापरा या तत्वावर या विमानतळाचे बांधकाम करण्याचा करार आयआरबी कंपनीशी केला होता. त्यानुसार या विमानतळाचे बांधकाम ना. नारायण राणे महाराष्टÑाचे उद्योग मंत्री असताना सुरू झाले आणि त्याचे बहुतांशी बांधकामही पूर्ण झाले होते. मात्र, ३ वर्षापूर्वी महाराष्टÑात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार स्थापन झाल्यावर या विमानतळाचे पुढील काम रेंगाळलेले होते. त्यातच बांधकाम अपूर्ण असताना आणि केंद्रसरकारची परवानगी नसतानाही शिवसेनेचे तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर, शिवसेनेचे खा.विनायक राऊत यांनी विमानतळ उद्घाटनाचा फार्स करून नंतरच्या गेल्या दोन-अडिज वर्षाच्या कालावधीत अधून-मधून उद्घाटनाच्या केवळ तारखा जाहीर करून या विमानतळाच्या शुभारंभाचा घोळ घालून ठेवला होता.
आता या विमानतळाचे संस्थापक-निर्माते ना. नारायण राणे यांनीच पुढाकार घेत केंद्रीय हवाई वाहतुक मंत्रालयाच्या परवानगीचा विषय मार्गी लावला असून येत्या महिन्याभरात केंद्रीय हवाई वाहतुक मंत्र्यांना ते उद्घाटनासाठी घेऊन येत आहेत. चिपीविमानतळाचे भूमिपूजन ना. नारायण राणे यांच्याहस्तेच झाले होते. आता विमानतळाचे उद्घाटन व विमानोड्डाचा शुभारंभही ना. नारायण राणे यांच्याच पुढाकाराने व प्रमुख उपस्थितीत होत आहे. त्यामुळे कोकणवासीय ना. नारायण राणे यांना धन्यवाद देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!