कणकवली महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

कणकवली महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

*कोकण Express*

*कणकवली महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य कृतीवर अनेक चित्रपट निर्माण झाले आहेत. त्यांचे चित्रपट तमाशाप्रधान व सामाजिक जीवनातील अनेक समस्यांना थेट भिडणारे आहेत. चंद्रकांत, सूर्यकांत व जयश्री गडकर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णाभाऊंच्या कथाकादंबरीतील पात्रे जिवंत केली असे सांगतानाच लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय चळवळ उभी करून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले. त्यांचे विचार विद्यार्थ्यांनी जोपासले पाहिजेत, असे प्रतिपादन कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले. कणकवली कॉलेज कणकवली येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. बालाजी सुरवसे यांनी दोन्ही महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले. विचारमंचावर प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. बालाजी सुरवसे, प्रा. डॉ. सोमनाथ कदम, प्रा. सौ. सीमा हडकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सुरवसे यांच्या हस्ते संशोधन शोधपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी प्राध्यापकांनी संशोधन पेपर तयार करून सामाजिक समस्यांचा शोध घेतला पाहिजे असे सांगितले. प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला. तर प्रा. सीमा हडकर यांनी लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज महालिंगे, आभार प्रा. डॉ. बाळू राठोड यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!