*कोकण Express*
*बारावीचा निकाल जाहीर ; राज्यात कोकण विभाग अव्वल…*
*मुंबई, ता.३ :*
आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून राज्याचा निकाल ९९.५३ टक्के लागला आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाचा निकाल ८.५७ टक्क्यांनी वाढला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९९.४५ टक्के, कला शाखेचा निकाल ९९.८३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९१ टक्के लागला आहे. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९९.८१ टक्के तर दुसऱ्या क्रमांकावर मुंबई विभागाचा ९९.७९ टक्के एवढा आहे.
विभागनिहाय टक्केवारी
कोकण – ९९.८१ टक्के, पुणे- ९९.७५ टक्के, नागपूर – ९९.६२ टक्के, औरंगाबाद – ९९.३४ टक्के, मुंबई- ९९.७९ टक्के, कोल्हापूर -९९.६७ टक्के, अमरावती – ९९.३७ टक्के, नाशिक – ९९.६१ टक्के, लातूर – ९९.६५ टक्के
परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी – १३,१९७५४
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – १३,१४,९६५
एकूण निकाल – ९९.६३ टक्के.

