*कोकण Express*
- *यांच्या मुलांचीही लग्न आता आमच्याच पैशाने होणार…*
*नितेश राणे; महापालिकेच्या खर्चावरून शिवसेनेला पुन्हा एकदा टोला…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आता ह्यांच्या मुलांची लग्ने सुध्दा आमच्याच पैशाने होणार आहेत,असा टोला आमदार तथा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे.कंगना रानौतने महापालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती.या दाव्यासाठी महापालिकेकडुन वकीलाच्या फी पोटी निव्वळ ८२ लाख पन्नास हजार रुपये खर्च झाले आहेत.ही सर्व माहीती माहीतीच्या अधिकारा खाली उघड झाली आहे.दरम्यान याबाबतची माहीती मिळाल्यानंतर श्री.राणे यांनी शिवसेना नेत्यांना हा टोला लगावला आहे.