जानवलीत कंटेनर अपघातात चालक ठार

जानवलीत कंटेनर अपघातात चालक ठार

*कोकण Express*

*जानवलीत कंटेनर अपघातात चालक ठार!*

*सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला अपघात!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर जानवली पुला जवळ हॉटेल बावरची समोर महामार्गाच्या डीवाईडर वर चढत पलटी झाल्याने कंटेनर चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. अपघात नेमका कसा घडला हे जरी समजले नसले तरी कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर डीवाईडर वर चढल्यामुळे पलटी झाला असावा अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे! हा अपघात एवढा भीषण होता की यात पलटी झालेल्या कंटेनर खाली चालक अडकल्याने चालकाचा कमरेखालील भाग अक्षरशा छिन्नविछिन्न झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कणकवली वाहतूक पोलीस संदेश आबिटकर, वैभव कोळी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर पलटी झालेला तो कंटेनर हटविण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!