दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील दोघे ताब्यात

दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील दोघे ताब्यात

*कोकण Express*

*दारू वाहतूक प्रकरणी सावंतवाडीतील दोघे ताब्यात…*

*एलसीबीची इन्सुलीत कारवाई ; कारसह सव्वा दोन लाखांची मुद्देमाल जप्त…*

*बांदा ः प्रतिनिधी*

बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडीतील दोघांना इन्सुली-खामदेव नाका येथे अटक करण्यात आली आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने केली.याप्रकरणी दारूसह ५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डॅनिश फर्नांडिस (वय २५) इन्सुली व विठ्ठल संतोष चौगुले (वय २२) रा.चिपटे अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद प्रवीण वालावलकर यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, त्यातील संशयित हे आपल्या कारमधून गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने दारू वाहतूक करणार असल्याची माहिती अज्ञातांकडून पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने इन्सुली-खामदेव नाका येथे सापळा रचला. यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हे दोघेजण दारू घेऊन येत असताना संशयितरीत्या आढळून आले.त्या दोघांना थांबवून पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्या गाडीत सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल आढळून आला. याप्रकरणी दोघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण वालावलकर, गुरुनाथ कोयंडे, श्री कांदळगावकर, श्री.नार्वेकर यांच्याकडून करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!