*हरकुळ खुर्द चे शिवसेना ग्रापंचायत सदस्य व शिवसैनिक भाजपात*

*हरकुळ खुर्द चे शिवसेना ग्रापंचायत सदस्य व शिवसैनिक भाजपात*

*कोकण Express*

*हरकुळ खुर्द चे शिवसेना ग्रापंचायत सदस्य व शिवसैनिक भाजपात*

*कणकवली तालुक्यात शिवसनेला भाजपाचा दुसरा धक्का*

*आमदार नितेश राणे यांनी केले स्वागत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यात शिवसेनेची गळती दिवसेन दिवस सुरूच आहे.तोंडवली बावशी येथील शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भाजपात पक्ष प्रवेश केल्यानंतर आज हरकुळ खुर्द मधील शिवसेनेच्या दोन ग्रापंचायत सदस्य आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. ग्रामपंचायत सदस्य संतोष काशीराम जाधव,सौ. साक्षी शामसुंदर रासम,दिलीप घाडी, यांच्या सह प्रमुख कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपात स्वागत केले.भाजपा पक्षाच्या शाल, व झेंडे देऊन ओंगणेश निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.
या पक्ष प्रवेशात सेनेचे कार्यकर्ते दिलीप घाडी, शामसुंदर रासम, अनिकेत रासम, अभिषेक सावंत, प्रदीप रासम, ओमकार गायकवाड, शेखर कुलकर्णी, तेजस मेस्त्री,केशव घाडी,आदी सह कार्यकर्त्यांचा समावेश आहे.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजन चिके,उपाध्यक्ष सुभाष दळवी,पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, तुषार रासम , सर्वेश दळवी, साई चव्हाण,रोहित घाग, सूर्यकांत डोंगरे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बुक्स
*हरकुळ खुर्द गाव विकासाठी राणेंचे नेतूत्व हवे*
हरकुळ खुर्द गावाच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री खा.नारायण राणे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस,माजी खासदर निलेश राणे , आमदार नितेश राणे,यांच्या नेतूत्वाची आणि भाजपा पक्षाची गरज आहे.त्यामुळेच आम्ही भाजपा पक्षात प्रवेश केला आहे.त्यांच्या सोबत गावाच्या हितासाठी काम करू अशी प्रतिक्रिया सेनेतुन पक्ष प्रवेश केलेले प्रमुख कार्यकर्ते दिलीप घाडी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!