नवीन कुर्ली येथे सभापती मनोज रावराणे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ

नवीन कुर्ली येथे सभापती मनोज रावराणे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ

*कोकण Express*

*नवीन कुर्ली येथे सभापती मनोज रावराणे यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ*

*कणकवली ः प्रतिनिधी*

“नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ” यांच्या विशेष प्रयत्नातुन नवीन कुर्ली गावातील ग्रामस्थांचे “कोव्हॅक्सीन” लसीकरण जि.प. पुर्ण प्राथमिक शाळा नवीन कुर्ली येथे आज शुक्रवार दि. ३०/०७/२०२१ रोजी करण्यात आले.
त्या प्रसंगी कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे,लोरे नं १ चे सरपंच अजय रावराणे, राजू रावराणे नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलतेे, उपाध्यक्ष सुरज तावडे, सचिव धिरज हूंबे,खजिनदार रविंद्र नवाळे, नवीन कुर्ली प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जोशी मॅडम तसेच मंडळाचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या लसीकरणात डोस घेणा-या प्रत्येक व्यक्तीस ‘नवदुर्गा युवा मंडळ’ (रजि.) कडुन विनामुल्य “बिस्किट व पाणी बॉटल” ची व्यवस्था केली गेली होती.
गावांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!